Dainik Maval News : मुकाई चौक किवळे येथे दररोज होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एकेरी वाहतूकीसह इतरही उपाययोजना कराव्यात, यासाठी भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका सरचिटणीस साहेबराव बोडके, गहुंजे गावचे सरपंच कुलदीप बोडके, भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस निशित अंकन सिंग यांनी याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांना दिले. यावेळी सतीश भेगडे, मंगेश रासकर उपस्थित होते.
सकाळ आणि सायंकाळ च्या सत्रात मुखाई चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थी आणि कामगार यांना बसत आहे. येथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेवर पोहोचण्यास विलंब होतो. याकरिता एकेरी वाहतूक पद्धतीचा अवलंब केल्यास ही वाहतूक कोंडी टाळता येवू शकते. याबाबत सकारात्मक विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा उपायुक्त बापू बांगर यांना देण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती
– खोपोली शहरात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न, 150 कुस्तीपटूंचा सहभाग । Khopoli News
– लोणावळा नगर परिषदेने लागू केलेल्या कर वाढीला शहरवासियांचा विरोध ; जागरूक नागरिक मंचकडून स्वाक्षरी मोहीम । Lonavala News