तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत सीआरपीएफ नाक्या समोर जुना मुंबई पुणे महामार्गावर आज (शुक्रवार, 17 मार्च) रोजी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक घोडी गंभीर जखमी झाली होती. जोरात धडक बसल्याने घोडी रस्त्याच्या कडेलाच पडली होती. वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना याची माहिती मिळताच त्यांची तत्काळ घटनास्थळी जात मतदकार्य केले. ( Talegaon Dabhade Life Saving Video Of An Accident Mare )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
घोडीच्या मागच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याने तिला उठता येत नव्हते. अखेर गोशाळेचे शेखर गराडे, रुपेश गराडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे आणि स्थानिक गोसेवक, तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भडकवाड आणि कर्मचारी वर्ग आदींनी घोडीला सुरक्षित रित्या टेम्पोत चढवले आणि पुढील उपचारासाठी एनिमिल रेस्क्यू सेंटर भुगाव या ठिकाणी पाठवले आहे.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
– ‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके