तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला साजरा होणार आहे. त्यासाठी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी मावळते अध्यक्ष गोकुळ अनिल भेगडे यांनी प्रास्तविक केले. मावळते खजिनदार प्रणव मारूती भेगडे, यांनी गतवर्षीचा अहवाल आणि हिशोब सादर केला.
याच बैठकीत उत्सव समितीचे पंच मंडळी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ( Talegaon Dabhade Shri Dolasnath Maharaj Utsav Samiti 2023-24 Executive Committee Announced Pranav Bhegade Elected As President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे ;
अध्यक्ष – प्रणव मारुती भेगडे
खजिनदार – अक्षय अशोक पाटोळे
सरचिटणीस – प्रणव विक्रम दाभाडे
प्रसिद्धी प्रमुख – अश्विन नथुबाबा माने
आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणाले की, या उत्सवाला असलेल्या ऐतिहासिक परंपरेला अनुसरून आणि आधुनिक बदलांनुसार उत्सव साजरा करण्याचा मी आणि माझे सहकारी नक्कीच प्रयत्न करतील.आपल्याला मिळालेल्या सर्व जवाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. माजिक नेत्यांनी तसेच सर्व माजी अध्यक्षांनी व जेष्ठ मंडळी यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी किरकोळ कारणावरुन तुफान राडा, 9 जणांवर गुन्हा
– सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल