Dainik Maval News : महिला सक्षमीकरणासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत फॅशन डिझायनिंग आणि दुचाकी व्हीलर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप आणि प्रशस्तीपत्रक वाटप समारंभ नुकताच संपन्न झाला.
- मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून दरवर्षी महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने त्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण 3 महिने, तसेच टू व्हीलर प्रशिक्षण 20 दिवसाच्या प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात प्रशिक्षणाचा समारोप व प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आले. यावेळी महिलांना मोफत लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देण्यात आले. टू व्हीलर प्रशिक्षण प्रशिक्षिका शितल जाधव, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण संस्थेच्या तारिका व प्रशिक्षिका मयुरी घोजगे यांसह सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनी आपले अनुभव सांगितले. नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी तथा महिला व बालकल्याण विभाग प्रमुख ममता राठोड तसेच अर्चना काळे यांचे विशेष आभार मानले.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne