पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यासमवेत आमदार सुनिल शेळके यांची मावळ तालुक्यातील विविध कामांसंबंधित आढावा बैठक पुणे इथे संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत मावळ तालुक्यातील ग्रामस्थांकडून काही तक्रारी येत आहेत आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था देखील झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यांची पाहणी करावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने सदर बैठकीत, ‘तक्रारी असलेल्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करुन पुढील महिन्याभरात अहवाल सादर करावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. खराब झालेल्या रस्त्यांची माहिती घ्यावी’ असे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी जि.प. चे सीईओ रमेश चव्हाण, आमदार शेळके, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उप मुख्य कार्यकारी अभियंता विजय नलावडे, अभियंता रितेश मुंडे आदीजण उपस्थित होते. ( there will be third a party audit of Jal Jeevan Mission water schemes with complaints in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय? त्या निवडणूका कधी जाहीर होणार? नक्की वाचा
– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
– ठरलं तर..! महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ‘मावळ लोकसभा’ निवडणूक लढवणार; वाचा काय आहे मनसेचा प्लॅन?