Daink Maval News : कान्हे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी बसविण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून वारंवार ट्रान्सफॉर्मर चोरीला जात असल्याने कान्हे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. आता चोरीला गेलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून गावासाठी इंद्रायणी नदीतून पाणीपुरवठा होत होता. परंतु ट्रान्सफॉर्मर चोरीस गेल्याने हा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. (Transformer stolen from Kanhe village)
कान्हे – नायगाव गावात मोठी लोकवस्ती आहे. जवळच काही कंपन्या व औद्योगिक वसाहत आहे. याठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर जवळपासचे मोठे क्षेत्र अवलंबून आहे. मात्र विद्युत रोहित्र चोरीस गेल्याने सर्वांचेच आता पाण्याअभावी हाल होणार आहे. तसेच सध्या रब्बी पिकांना पाण्याचा पुरवठा करण्याची गरज पडते. यामुळे विद्युतपुरवठ्या अभावी विजेवर चालणारे पाण्याचे पंपही बंद पडणार असल्याने शेतकरीही काळजीत आहेत.
रोहित्र चोरीच्या घटनांमुळे गावचा पाणीपुरवठा तसेच शेतकर्यांच्या शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नदीचे पाणी वापरता येत नाहीये. शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कान्हे भागात विद्युत रोहित्र, केबल, पंप चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link