पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही युवक काल, सोमवारी बुडाले होते. परंतू आज, मंगळवारी (दि. 23 एप्रिल) त्यांचे मृतदेह शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे. पहिला अपघात हा मावळ तालुक्यातील कासारसाई येथील कुसगाव धरणात घडला. तर दुसरा अपघात हा चाकण जवळील वाकी येथील नदी पात्रात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यातील पहिल्या अपघातात कासारसाई येथील धरणात बुडून एका 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. माधव हरगौरी सिंग (वय 17 रा. नाशिक एमआयडीसी) असे मृत पावलेल्या सदर तरूणाचे नाव आहे. सोमवारी तो कासारसाई डॅममध्ये बुडाला होता. त्याच्या शोधार्थ कालही शोधमोहिम राबवण्यात आली. परंतू आज त्याचा मृतेदह रेस्कू टीमच्या हाती लागला. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ( Two youths drowned in separate accident at Kasarsai and Chakan in Pune district )
दुसरा अपघात हा चाकण जवळील वाकी गावाजवळ घडला. या घटनेतही एका 14 वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. वाकी गावाजवळील भाम नदीत बुडून विक्रम थापा (वय 14 रा. चाकण) या बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी बुडलेल्या या बालकाचा मृतदेह शोधण्यात आज रेस्कू टीमला यश आहे. हा अपघात चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून चाकण पोलिस पुढील तपास करत आहेत.
मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ निलेश गराडे, अनिल आंद्रे, विनय सावंत, शुभम काकडे, आवी कारले, प्रथमेश सुपेकर, रमेश कुंभार, कुणाल दाभाडे, वैभव वाघ, गणेश गायकवाड, आशिष बोडके यांनी रेस्कू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, ‘या’ 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road
– तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade
– आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मविआची महत्वाची बैठक । Maval Lok Sabha