मावळ तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई बाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी पत्रात, मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह इतर अनेक घटकांचे नुकसान झाले असल्याचे उल्लेख करत त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे सुचित केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय म्हटलेत खासदार बारणे –
“मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची भात काढणी सुरु असून मावळ तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सतत अवेळी अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात भिजल्याने गुरांचा पेंडा देखील खराब झाला आहे. तसेच इतर छोटे मोठे व्यावसायिक वीट भट्टी, पोल्ट्री व्यवसाय इत्यादींचे पण नुकसान झाले आहे. सध्याचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असून आपण त्वरित अवाळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकरी वर्ग आणि इतर व्यवसायिक यांना नुकसान भरपाई बाबत योग्य ती मदत व सहकार्य करावे,” असे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना पाठवले आहे. ( unseasonal rain in maval pune make panchnama early letter by mp shrirang barane )
अधिक वाचा –
– तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर
– Breaking! मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात
– मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade