व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येळसे गावात वीज कोसळून जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक, अवकाळी पावसामुळे पवनमावळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मावळ तालुक्यात ( गुरुवार, दिनांक 16 मार्च) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकटासह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
Unseasonal-Rain

Photo : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात ( गुरुवार, दिनांक 16 मार्च) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकटासह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये येळसे गावातील शेतकरी सुभाष खंडू कडू यांच्या शेतातील जनावरांनसाठी साठवून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्यावर विज पडून चारा भस्मसात झाला आहे. तसेच पवनमावळ भागातील गहु, हरभारा, काकडी, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, भुईमूग आदी रबी हंगमातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ( Unseasonal Rain In Maval Taluka Pune Lightning Struck Animal Fodder And All Fodder Burnt In Yelase Village Near Pavananagr )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अचानक झालेल्या आवकाळी पावसाने आताही मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साठून राहिले आहे. रब्बी हंगामातील पिकांचे यातून मोठे नुकसान होत आहे.. त्यामुळे बळीराजाच्या संकटात भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांवर कोसळलेले हे अस्मानी संकट पाहता, शेतकऱ्यांची साधी विचारपूस करायला आणि नुकसान पाहायला अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकर्‍याच्या बांधावर गेलेला नाही. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अधिकारी कधी येतील? असा प्रश्‍न सर्वसामान्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा – अवकाळीने आणली अवकळा! पवनमावळातील शिळींब, मोरवे, चावसर, तुंग गावांतील शेतकरी संकटात; वीट व्यावसायिकांचेही नुकसान

येळसे, काले, कोथुर्णे, शिवली, महागांव, कडधे, करुंज, शिवणे, बौर, वारु, आर्डव, मळवंडी, आढे, सडवली, ओझर्डे, सडवली, उर्से या भागातील रब्बी हंगामातील पिकांच्या शेतीत पाणी साचून राहिल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र संकटात आले आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे नुकसान आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर रब्बी पिकांचे नुसकानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.

“गुरुवारी झालेल्या आवकाळी पावसामुळे मी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर विज कोसळून चाऱ्याला आग लागून संपुर्ण चारा जळून गेला आहे. तसेच गहु,काकडी,मका व टोमॅटो पिकांचे मुठे नुसकान झाले आहे. गहु अजुन दोन आठवड्यात काढणीला आला होता तर टोमॅटो ला फुले लागली होती पावसामुळे सर्व फुले गळाली असल्याने आतातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे,” अशी मागणी शेतकरी सुभाष कडू यांनी केली आहे. ( Unseasonal Rain In Maval Taluka Pune Lightning Struck Animal Fodder And All Fodder Burnt In Yelase Village Near Pavananagr )

अधिक वाचा – 

– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
– तळेगावात अपघातग्रस्त घोडीला जीवदान, वन्यजीव रक्षक मावळ आणि गोशाळेच्या प्राणीमित्रांनी दाखवली तत्परता – व्हिडिओ
– ‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके


Previous Post

तळेगावात अपघातग्रस्त घोडीला जीवदान, वन्यजीव रक्षक मावळ आणि गोशाळेच्या प्राणीमित्रांनी दाखवली तत्परता – व्हिडिओ

Next Post

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्म’हत्या, परिसरात खळबळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Police

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्म'हत्या, परिसरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
Pravin Bhawar appointed as chairman of Mangal Parinay Sohla 2026 by Janhit Charitable Trust

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

February 27, 2026
Inauguration ceremony of Late Ajitdada Pawar Pratishthan at Adhale Budruk Maval on Saturday

आढले बुद्रुक येथे शनिवारी “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा

February 27, 2026
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ; ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.