वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या संस्थापिका कै. निर्मलाताई पुरंदरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘निर्मला पुरस्कार’ वडगाव येथील आदर्श शिक्षिका सुरेखा बाळू कुंभार यांना प्रदान करण्यात आला. दिनांक 5 जानेवारी (शुक्रवार) रोजी पुण्यातील अच्युत आपटे वसतीगृह येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार कुंभार यांना प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिक्षणासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वनस्थळी ग्रामीण विकास संस्था कार्य करते. 2004 पासून संस्थेचे कार्य अविरतपणे सुरु आहे. वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळांत विद्यार्थ्यांना दररोजच्या अभ्यासाशिवाय दुपारच्या सत्रात वाचन वर्ग, विज्ञान वर्ग आणि छंद जोपासणीसाठीचे वर्ग घेतले जातात. संस्थेच्या सहयोगी सभासदांमार्फत हे कार्य केले जाते. ( Vansthalli organization Nirmala Award 2024 To Teacher Surekha Kumbhar Vadgaon Maval )
सुरेखा कुंभार या वडगाव मावळ येथील रहिवासी असून त्या तळेगाव दाभाडे शहरातील करुणांजली स्पेशल स्कूल मध्ये 2016 सालापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. यासोबतच वनस्थळी संस्थेच्या माध्यमातून वडगावमधील न्यू इंग्लिस स्कूल शाळेत, तसेच अन्य काही जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या वाचन वर्ग, विज्ञान वर्ग, छंद जोपासणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेमार्फत त्यांना यंदाचा निर्मला कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade
– ‘व्हर्टिव्ह’तर्फे चाकण भागात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन! उद्योगाप्रती वचनबद्धता मजबूत करत ‘मेक इन इंडिया’ अभियानाला समर्थन