पवनानगर : आकर्षण निर्माण होणे नैसर्गिक आहे. मात्र काय चांगले आणि काय वाईट याचे भान राखावे. भावनेच्या आहारी जाऊ नये. मुलींनी सतर्क रहा, सजग रहा, जपून रहा, असा सल्ला साहित्यिक, लेखिका व कवियत्री प्रा. विजया मारोतकर यांनी पवनानगर येथील व्याख्यानात दिला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील पवनानगर, कार्ला, इंदोरी, कान्हे आणि तळेगाव दाभाडे येथील 10 विविध शाळांमध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मंगळवारी (दिनांक 26 सप्टेंबर) पवना विद्या मंदिर येथील सभागृहात ‘पोरी जरा जपून’ या प्रबोधनात्क व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी मारोतकर बोलत होत्या. मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार व आजच्या तरुण पीढीत वाढलेल्या मोबाइल इंटरनेटचा गैरवापर या घटनाच्या पार्श्वभूमीवर मुलींनी स्वतःच्या सुरक्षेकरिता कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. समाजातील आपले स्थान व पावित्र्य कसे अबाधित ठेवता येइल, याविषयी माहिती या कार्यक्रमातून प्रा. मारोतकर यांनी दिली. ( Vijaya Marotkar Lecture For Students And Women At Pavananagar Maval )
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष राहुल खळदे होते. यावेळी रोटरीचे आंतोष मालपोटे, संदिप मगर, ज्ञानेश्वर दुर्गुडे, काले पोलिस पाटील सिमा यादव, वारु पोलिस पाटील निता शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. मारोतकर पुढे म्हणाल्या, समाजात असामाजिक तत्व वाढलेले आहेत. मुली, महिलांवरील होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या रोज वाचायला, ऐकायला मिळतात. म्हणून सतर्क रहा, सजग रहा, जपून रहा, असा सल्ला त्यांनी दिला.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे आणि श्री डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी या विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी हा उपक्रम राबवला आहे. कार्यक्रमाला हजारावर 8 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच माता, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, सुत्रसंचालन रोशनी मराडे यांनी केले. वैशाली वराडे यांनी प्रा. मारोतकर परिचय करून दिला तर आभार संकुलाच्या पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांनी मानले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
व्याख्यानाचे नियोजन खालीलप्रमाणे;
1) दिनांक 26/9/2023 – पवना विद्या मंदिर, पवनानगर आणि प्रगती विद्या मंदिर इंदोरी
2) 27/9/2023 – नवीन समर्थ विद्यालय व मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव (सकाळी) आणि
ॲड पु वा परांजपे विद्या मंदिर व स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव दाभाडे (दुपारी)
3) दिनांक 29/9/2023 – एकविरा विद्या मंदिर, कार्ला सकाळी 10 वाजता आणि श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर, कान्हे दुपारी – 1.30 वाजता
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन, ‘ही’ आहे अंतिम तारिख
– घरगुती गौरी सजावट स्पर्धेत सुप्रिया चौधरी प्रथम । Talegaon Dabhade
– चोरांचा सुळसुळाट! कातवी गावाच्या हद्दीतील बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजाराची चोरी