मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध समस्या संदर्भात तहसीलदार विक्रम देशमुख आणि एमएसआरडीसीचे राकेश सोनवणे यांच्यासमवेत शेतकरी बांधव आणि नेते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रविंद्र भेगडे यांनी दिला. ( villagers demands service road at mumbai pune expressway maval taluka )
तसेच मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गालगत सर्व्हिस रस्ता करावा, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी जमिनी संपादित केलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाक्यास “उर्से टोलनाका” असे नाव देण्यात यावे, द्रुतगती महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनी वापरावीना पडून आहेत अशा जमीनी मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात इ. प्रमुख समस्यांचा समावेश आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी भाजपा मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, भाजपा किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष सुभाषराव धामणकर, माजी उपसभापती शांताराम कदम, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ता माळी, गुलाब घारे, शांताराम दरेकर, राजाभाऊ असवले, मच्छिंद्र केदारी, गुलाबराव धामणकर, कृष्णा कारके, संदीप आंबेकर, विकास धामणकर, माऊली सोनवणे, दिनकर शेटे, सुनील गुजर, विलास दळवी, निवृत्ती साठे, नारायण बोडके, निलेश मुर्हे, बाळासाहेब मोहोळ, स्वप्नील अंभोले, संतोष काळे, प्रकाश ठाकर, बाळू काळे, रामभाऊ कालेकर, ज्ञानेश्वर घारे, किसन घारे महामार्ग लगतचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election
– कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक
– बिगुल वाजलं! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर, 9 ऑक्टोबरपासून प्रक्रिया होणार सुरु