मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ सोमवारी (28 नोव्हेंबर) रोजी एका वॅगनर कारचा अपघात झाला. भरधाव ट्रकने धडक दिल्याने वॅगनर कारचा अपघात झाला. यात कारमधील चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खोपोली नगगरपालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. ( Wagoner Car Accident Near Khopoli On Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिट जवळ ही कार आली असता पाठीमागून येणाऱ्या ट्रकने कारला डाव्या बाजूला धडक दिली. त्या धक्क्याने हीच कार समोरील टेम्पोवर आदळली. या अपघातात कारचे संपूर्ण नुकसान झाले, मात्र सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले आहेत. चार जखमींमध्ये महिला-पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पलंगे आणि लांडे (रा. दौंड – पुणे) या कुटुंबातील हे सदस्य आहेत. बोरघाट वाहतूक पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय यांची घटनास्थळी मदत झाली.
View this post on Instagram
जखमींची नावे ;
१. सचिन पलंगे – 42 वर्ष
2. सिद्धी सचिन पलंगे – 10 वर्षे
3. प्रियंका अमोल लांडे – 32 वर्ष
4. श्लोक सचिन पलंगे – 5 वर्षे
अधिक वाचा –
– स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकलीचा करूण अंत, काही दिवसांवर होता वाढदिवस; खंडाळा येथील दुर्दैवी घटना
– मावळच्या तळपेवाडीचा ‘सागर’ बनला ‘एसटीआय’, MPSC परीक्षेत घवघवीत यश, गावाने काढली जंगी मिरवणूक