आंदर मावळातील माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक – तळपेवाडी , पिंपरी येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने एकुण 4 कोटी 1 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या योजनेचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दिनांक 27 नोव्हेंबर) महिला भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
जल जीवन मिशन अंतर्गत माळेगाव खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 5 लाख, पिंपरीसाठी 1 कोटी 41 लाख, माळेगाव बुद्रक तळपेवाडीसाठी 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ( Water Supply Scheme at Malegaon Talpewadi Pimpri In Andar Maval Under Jal Jeevan Mission )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
असे होणार योजनेचे काम ;
- माळेगाव खुर्द येथे पंचवीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि साडेतीन किलोमीटर पाईपलाईन
- पिंपरी येथे एकोणतीस हजार लिटर क्षमतेची टाकी आणि सहा किमी पाईपलाईन
- माळेगाव बुद्रुक तळपेवाडी येथे आठ किमी पाईपलाईन करण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहचवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.
आंदर मावळातील दुर्गम भागात असणारी ही गावे आहेत. येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते. या समस्येची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करुन या गावांतील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे येथील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.
हेही वाचा – L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा
#आंदर मावळातील माळेगाव खु. पिंपरी, माळेगाव बु.-तळपेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला.जल जीवन मिशन @jaljeevan_ अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण ४ कोटी ०१ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे. pic.twitter.com/zAxzSFQsx9
— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 28, 2022
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, संगिता शेळके, माजी सभापती शंकरराव सुपे, लक्ष्मणराव ठाकर, दत्तात्रय पडवळ, सरपंच साधना काठे, उपसरपंच अंकिता गायकवाड, सदस्य बाळासाहेब खंडागळे, शंकर बोऱ्हाडे, रोहिणी कोकाटे, कुंदा बोऱ्हाडे, ग्रामसेवक राहुल देशमाने, राजेश कोकाटे, मारुती करवंदे, सरपंच इंगळुण सुदाम सुपे, भरत जोरी, कल्पेश मराठे, सुनिल ताते, अंकुश ठाकर, बाबासाहेब घाडगे, कमल कोकाटे,अरुण मोरमारे, दशरथ दगडे, यमाजी बोऱ्हाडे, चिंधु बोऱ्हाडे, सविता बोऱ्हाडे, शशिकला सातकर, आदिका तनपुरे, अनिता आंद्रे इ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी गुडन्यूज, जाणून घ्या
– खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग
– कोंडिवडे येथून अपहरण झालेल्या मुलीची उत्तराखंडमधून सुटका, वाचा सुटकेचा थरारक अनुभव