वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने पती आणि सासऱ्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास बबनवर घोजगे (पती – 34 वर्षे), बबनवर वरसु घोजगे (सासरा – 75 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. ( Wife Beaten By Husband In Talegaon Dabhade Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पीडित महिलेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. तसेच त्याच्या डोक्यावर कर्जही होते. याचा फायदा घेत सासऱ्याने मला तुझे वेड लागले आहे म्हणत सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद लागलाय. तो कर्ज फेडू शकत नाही. मी तुमचे कर्ज फेडतो, तसेच जमिनही नावावर करुन देतो, असे म्हणत सासऱ्याने सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिच्या शरीराला अश्लील स्पर्शही केला, असे फिर्यादीने म्हटले आहे.
सदर बाब महिलेने पतीला सांगितली, मात्र पतीनेही वडिलांच्या मनाप्रमाणे वाग, त्यांना खूश कर. ते आपले कर्ज फेडणार आहेत, त्यामुळे त्यांना खूश कर. मला तुझ्यात रस राहिला नाही, असे सांगितले. मात्र महिलेने नकार देताच पतीने तिला मारहाण केली. यानंतर पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार तळेगाव पोलिसांनी पती आणि सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अधिक वाचा –
– मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करून दरोडा टाकणारे चोरटे दोन दिवसात गजाआड I Pune Crime
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची आढावा बैठक संपन्न