व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 2, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील पिंकेथॉन रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या उपस्थितीत मॅरेथॉनचे उद्घाटन

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने महिलांमध्ये कर्करोग जनजागृती करण्यासाठी 'फाईट अगेंस्ट कॅन्सर: रोटरी सिटी पिंकेथॉन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2023
in शहर, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल
Siddharth-Chandekar-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Rohit Bhutkar


तळेगाव दाभाडे नगरपरिषद, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने महिलांमध्ये कर्करोग जनजागृती करण्यासाठी ‘फाईट अगेंस्ट कॅन्सर: रोटरी सिटी पिंकेथॉन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 7 वाजता तळेगाव दाभाडे इथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रॅलीला प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर उपस्थित होता. योग्यवेळी उपचार घेतल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊन कर्करोगमुक्त सुखी जीवन जगता येते, असा संदेश मॅरेथॉन वेळी देण्यात आला. ( Women Spontaneous Response To Pinkathon Rally Organized For Cancer Awareness Inauguration Of Marathon By Marathi Actor Siddharth Chandekar )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महिलांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या या पिंकेथॉनचे उद्घाटन अभिनेते सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते झाले. ही मॅरेथॉन दौड मारुती चौक ते टी जी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर पर्यंत तीन किलोमीटर एवढी होती. यात सहभागींना टी-शर्ट तसेच मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना पदके देऊन गौरवण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये कर्करोगासंबंधीत माहिती पत्रके वाटण्यात आली, तसेच जनजागृती करणारी फलके लावण्यात आली होती.

स्त्रियांमध्ये होणारे, स्तन, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुख्याच्या कर्करोगाबाबत टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या डॉ. शिल्पी डोळस यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरने अल्प दरात उपलब्ध करून दिलेल्या तपासणी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.

हेही वाचा – बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day

या कार्यक्रमावेळी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी अध्यक्ष दिपक फल्ले टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ मनोज तेजानी तसेच प्रकल्प प्रमुख डॉ धनश्री काळे, सहप्रकल्प प्रमुख सुनंदा वाघमारे, पिंकेथॉनचे समन्वयक डॉ विद्या पोतले, टी.जी.एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे संचालिका ब्रेस्टऑन्को सर्जन डॉ शिल्पी डोळस, डायरेक्टर सीएसआर अँड प्रिवेंटिव्ह हेल्थ डॉ नेहा कुलकर्णी, संचालक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ जयपाल रेड्डी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अल्टा कंपनीकडून मोठी मदत; वॉटर रेस्क्यू ऑपरेशन होणार अधिक जलद
– आमदार साहेब, इकडे लक्ष कधी देणार? कदमवाडी ते लंकेवाडीपर्यंतचा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर, लाखोंचा फंड कचऱ्यात जाणार?


Previous Post

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अल्टा कंपनीकडून मोठी मदत; वॉटर रेस्क्यू ऑपरेशन होणार अधिक जलद

Next Post

देशी बनावटीचे पिस्तूल आणि किलोभर गांजा सह दोन तरूणांना मावळ तालुक्यातील पुसाणे येथून अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

देशी बनावटीचे पिस्तूल आणि किलोभर गांजा सह दोन तरूणांना मावळ तालुक्यातील पुसाणे येथून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dehugaon Lonar community felicitates meritorious students Dehu News

देहूगाव : लोणारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न । Dehu News

July 2, 2025
Video of elderly farmer grandparents working in the fields in Latur district

VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

July 2, 2025
mns raj thackeray

लोणावळ्यात मनसेची धडाकेबाज कामगिरी ! ‘फी’साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला दणका । Lonavala News

July 2, 2025
Sachin Thakar elected as president of Maval Taluka Rural Journalists Association Vishal Kumbhar as vice-president

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

July 1, 2025
Last rites of former Maval MLA Krishnarao Bhegde

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

July 1, 2025
DCM Ajit Pawar pays emotional tribute to former Maval MLA Krishnarao Bhegde

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

July 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.