मार्केटिंगच्या बहाण्याने एका तरुणाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. दिनांत 16 जुलै ते 19 जुलै दरम्यान गहुंजे येथील लोढा बेलमांडो सोसायटीत हा प्रकार घडला. आनंद गिरिजाशंकर नगायेच (वय 35, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) यांनी याबाबात सोमवारी (दिनांक 24 जुलै) रोजी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद याच्या व्हॉटस्अप नंबरवर एक मेसेज आला, ज्यात ‘मी के मार्केटिंग एजेन्सीमधून तुम्हाला मेसेज केला असून आम्ही लोकांना फ्री ऑनलाइन नोकरीसाठी ऑफर देत आहोत. आम्ही सोशल मीडिया मार्केटींगचे काम करत असून, आमची कंपनी तरुण मुलांना इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोव्हर्स वाढवण्यासाठी मदत करते. तसेच, आमचे काम फक्त इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करणे आणि प्रत्येक अकाउंटला फॉलो केल्यावर तुम्हाला आम्ही 70 रुपये देणार आहोत. एका दिवसात तुम्ही लोकांना फॉलो करून तुम्ही 24 हजार रुपये कमवू शकता.
त्यानंतर, आरोपीने फिर्यादी यांना डेमो तीन अकाउंटचे डेमो दाखवतो, असे सांगत फिर्यादी यांना इंस्टाग्राम अकाउंटच्या लिंक फॉलो करण्यासाठी पाठविल्या. तसेच, फॉलो केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट मला पाठवा आम्ही तुम्हाला लगेचच 210 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाठवितो. त्यानंतर फिर्यादी यांनी तीन इंस्टाग्राम अकाउंटच्या लिंक फॉलो केल्या. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना एक फॉर्म पाठविला व त्यामध्ये त्यांचे नाव, वय, कामाचा अनुभव, बँकेचा अकाउंट नंबर ही माहिती भरून पाठवण्यास सांगितली. माहिती पाठविल्यावर ऑनलाइन व्यवहार करून फिर्यादी यांना वेळोवेळी पैसे पाठवण्यास भाग पाडून त्यांची सोशल मीडिया मार्केटिंगच्या नावाखाली एकूण 10 लाख 85 हजार 250 रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ सदर प्रकरणाचा पुडील तपास करत आहेत. ( 11 lakh fraud of youth on pretext of social media marketing case registered at Shirgaon Police Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल