तळेगाव दाभाडे शहरातील स्वामी समर्थ नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तब्बल 1131 किलो वजनाची शुद्ध तांब्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दिनांक 14 एप्रिल 2002 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी संगमरवरी मूळ मूर्ती हटवून त्या जागी नव्याने अस्सल तांब्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रसिद्ध शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांनी ही मूर्ती बनवली आहे. तर, वळामे आणि काकडे परिवाराच्या वतीने ही मूर्ती बनवण्यात आली आहे. रविवारी (दि. 21 एप्रिल) रोजी या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी वळामे एंटरप्राइजेसचे संचालक प्रकाश वळामे, कपिल वळामे, श्री सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे संचालक गणेश काकडे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पंकज सोळंकी, सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार, शेखर शिंदे, आशिष खांडगे आदी उपस्थित होते.
सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देताना सरदार घराण्याच्या माध्यमातून स्वामी समर्थांची होत असलेल्या सेवाकार्याची माहिती देत धार्मिक सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मानांकन प्रदान करण्यात आले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ( 1131 kg copper idol has been installed in Swami Samarth temple at talegaon dabhade )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग
– अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’
– ‘वंचित’च्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत होणार ‘तिरंगी’ लढत, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला? । Maval Lok Sabha