व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेने अनोळखी तरूणाचा मृत्यू

तळेगाव दाभाडे शहराजवळील घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
railway-track

file image


तळेगाव दाभाडे शहराजवळील घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवार ( दिनांक 4 जून ) रोजी रात्री पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार एस. बी. तोडमल यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवकाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेतीन वाजण्यापूर्वी घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ (किमी 160/22/24) अनोळखी युवकाचा धावत्या रेल्वेची (गाडी नं. 11005) धडक बसल्याने मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख पटलेली नसून त्याच्या वर्णनानुसार त्याची ओळख पटल्यास अथवा नातेवाईकांचा शोध लागल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत. ( an unidentified youth died after being hit by train near ghoravadi railway station )

मृत युवकाचे वर्णन – अनोळखी पुरूष, वय अंदाजे 25 वर्षे, उंची 5.42 फूट, अंगाने सडपातळ, रंगाने गहुवर्ण, चेहरा गोल, कपाळ उंच, डोक्याचे केस काळे, दाढी वाढलेले व मिशी केलेली, उजव्या दंडावर टॅटू, हातावर विशर अजय असे गोंदलेले आहे. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा ठिपके असलेला डिझाईनचा फुल बाहयाचा शर्ट, निळया रंगाची जिन्स, असे त्याच्या अंगावरील कपडे व इतर वर्णन आहे.

अधिक वाचा –
– वडगावातील श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायाने घ्यावा – खासदार बारणे
– मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी


Previous Post

‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्याकडून ‘स्वच्छ सुंदर निर्मळ वारी’चे आवाहन । Wari 2023

Next Post

मावळ बाजार समितीच्या प्रास्ताविक कामासंदर्भात सभापती संभाजी शिंदेंचे अजित पवारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-bajar-samiti

मावळ बाजार समितीच्या प्रास्ताविक कामासंदर्भात सभापती संभाजी शिंदेंचे अजित पवारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.