तळेगाव दाभाडे शहराचे माजी उपनगराध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कान्हे येथील पक्ष कार्यालयात काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माजी तालुकाध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, रोहिदास वाळुंज आदी उपस्थित होते.
लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे मेळावा होऊन, त्यात असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी यावेळी दिली. ( Former Deputy President of Talegaon Nagarparishad Ramdas Kakade Joins Congress Party )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : कोर्टाकडून आरोपी भानू खळदे ह्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कस्टडी । Kishor Aware Murder Case
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो