व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फोर व्हीलरला फॅन्सी नंबर पाहिजे? आरटीओकडून लवकरच नवीन मालिका, अशी करा नोंदणी

आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीच्या प्राधिकार पत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 18, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
four-wheeler

Image - Team Dainik Maval


चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( want a fancy number for a four wheeler new serial from RTO soon know registration process )

  • हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. हा धनाकर्ष किमान 301 रुपयांपेक्षा जास्त तसेच ‘आर.टी.ओ.पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृह परिवहन कार्यालय येथे उप प्रादेशिक अधिकारी व सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तिसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीच्या प्राधिकार पत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे. ( want a fancy number for a four wheeler new serial from RTO soon know registration process )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण


Previous Post

दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

Next Post

स्वातंत्र्यदिनी नवजीवन! राज्यातील विविध कारागृहांमधून तब्बल 186 कैद्यांची सुटका, जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Yerawada-Central-Jail

स्वातंत्र्यदिनी नवजीवन! राज्यातील विविध कारागृहांमधून तब्बल 186 कैद्यांची सुटका, जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

April 6, 2026
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

April 6, 2026
Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

April 6, 2026
total of 80 people including 15 women donated blood at blood donation camp in Ajivali Village maval

आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी

April 6, 2026
Chairman Deputy Chairman to be elected by ballot Maval Market Committee unique formula

भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं

April 6, 2026
Tata Punch CNG car is the cheapest and most powerful CNG car in the country know about punch car

तुमच्या कुटुंबाला धक्काही लागणार नाही ! टाटाची ‘ही’ कार आहे देशातील सर्वात स्वस्त अन् दणकट CNG कार, किंमत फक्त…

April 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.