व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठरली रणनिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री, मुंबई इथे पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 20, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा
shivsena-ubt-Party-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ लोकसभा आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री, मुंबई इथे पार पडली. पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक संपन्न झाली. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Maval Lok Sabha Constituency Review Meeting At Matoshree Mumbai )

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने राज्यातील लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यानुसार पक्षाकडून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शुक्रवारी, दिनांक 18 ऑगस्ट शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी मावळ विधानसभेचाही आढावा घेण्यात आला.

सदर बैठकीला शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक यशवंत तुर्डे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका संघटक अशोक निकम, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख किसन तरस, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, तालुका समन्वयक काळु हुलावळे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, युवराज सुतार युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, सरपंच प्रकाश सावंत, सल्लागार देवा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – काका-पुतण्याच्या भेटीने ठाकरे सावधान! पवारांविरोधात मावळात ‘पॉवर’ दाखवणार? वाचा नेमकं काय घडलंय…

मावळ मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा शिवसेनेचाच खासदार आहे. परंतू आता सध्याचे तिसऱ्या वेळीचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत म्हणजेच ‘खऱ्या’ शिवसेनेसोबत आहे. परंतू शिवसेनेचाच पारंपारिक मतदारसंघ असलेल्या मावळसाठी महाविकासआघाडीतील ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील तितकाच आग्रही असणार असून त्यांच्याकडून तसे उमेदवारी चेहरे पुढे येत आहेत. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Maval Lok Sabha Constituency Review Meeting At Matoshree Mumbai )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मंडळी! 18001208040 नंबर आताच सेव्ह करा, ‘हे’ दाखले मिळवताना अडचणी आल्यास लगेच फोन करा
– महाराष्ट्रात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धा, कशी असेल स्पर्धा? बक्षिसाची रक्कम किती? स्पर्धेचे नियम काय? जाणून घ्या सविस्तर
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वडगाव इथे संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ. विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन

Next Post

‘मावळ आपलाच…समझनें वालों को इशारा काफी’, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादीला खुले आव्हान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
praniti-shinde-maval-loksabha

'मावळ आपलाच...समझनें वालों को इशारा काफी', काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे शिवसेना - भाजपा - राष्ट्रवादीला खुले आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.