व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई! भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; देशी पिस्तूलांसह इतर हत्यारे आणि मुद्देमाल जप्त

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 5 जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 26, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


मावळ तालुक्यातील प्रसिद्ध भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 5 जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे कट्टे, सहा राऊंड, एक लोखंडी कोयता, सहा मोबाईल आणि 2 दुचाकी असा एकूण 97 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली. ( robbery gang jailed with weapons in bhandara dongar area of ​​maval taluka )

निरज भिकमसिंग सेन (वय 21, रा. तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे, मूळ रा. बौरावती, ता. शेहपूर, जि. धौलपूर, राजस्थान), योगेश सोरंग माहोर (20, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. आरुआ, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), सुनील ओमीप्रकाश माहोर (19, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. मिडाकूर, ता. मलपुरा, जि. आग्रा, उत्तरप्रदेश), श्यामसिंग मुन्नीलाल कोली (35, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. अरुआ, पो. मरहोलीता, ता. बाडी, जि. धौलपूर, राजस्थान), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका बालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ सुदवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला 5 जण अंधारात संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 3 देशी बनावटीचे कट्टे, 6 राऊंड, 1 लोखंडी कोयता, 6 मोबाइल आणि दोन दुचाकी असा 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी व एक मोबाइल माळवाडी ते वराळे रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करून चोरी केली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच त्यांच्याकडील दुसरी दुचाकी ही गुन्हा करताना वापरली असल्याचेही सांगितले. दुचाकी चोरीप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पांडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी, पंडीत आहिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. ( robbery gang jailed with weapons in bhandara dongar area of ​​maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गौरी-गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयात मिळणार ‘आनंदाचा शिधा’, पाहा कधी आणि कुणाकुणाला मिळणार शिधा?
– स्वातंत्र्यानंतर प्रथमच उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले; आमदार शेळकेंचे मानले आभार
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार


dainik maval jahirat

Previous Post

दुकानदारांनो, सावधान! अनधिकृत वजन काटे विक्री केल्यास किंवा वापरल्यास होणार कडक कारवाई

Next Post

वराळे गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pangolins-found

वराळे गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.