व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे निर्देश; वाचा प्रसाद वाटप करण्याची संपूर्ण नियमावली

अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमण 2011 अंतर्गत गणेश मंडळानी काळजी घ्यावी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 16, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Guidelines-regarding-Prasad-Distribution

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे : गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. ( Instructions to Ganesh Mandals to follow Guidelines regarding Prasad Distribution Read Complete Rules )

अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमण 2011 अंतर्गत गणेश मंडळानी काळजी घ्यावी. आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भक्तांना सेवनास देण्यात यावा. दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थांपासून तयार केलेला असल्यास ताजा प्रसाद भक्तांना मिळेल व सदर प्रसाद उरणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत.

भाविकासाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. जेणेकरून प्रसादाला धूळ, माती, माशा, मुंग्या या व इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत, त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत.

  • प्रसाद हाताळणाच्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजी पूर्वक अंमलबजावणी करावी. नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे, शिंगणे, थुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखु वा धुम्रपान करणे टाळावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असू नये. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रन घालावा तसेच केस संपूर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा.

प्रसाद तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झाकलेले असावे. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासून व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा तसेच मांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावीत. कच्च्या अन्न पदार्थांचा टाकाऊ कचरा आणि भक्तांना कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी अवश्य ठेवावी.

प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये शुल्क भरून अन्न व औषध प्रशासन यांचेकडे नोंद करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातून खरेदी करावीत, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) सु. ग. अन्नपुरे यांनी कळविले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी, वाचा काय आहे आदेश?
– दारुंब्रे गावात आरोग्य शिबिर, 69 रुग्णांची मोफत तपासणी, अनेक तज्ज्ञांकडून उपयुक्त मार्गदर्शन
– आनंदाची बातमी! तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड थेट एसटी बस सेवा, दिनांक 30 सप्टेंबरपासून होणार सुरु


dainik maval jahirat

Previous Post

“मागील 9 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे घमंडिया”

Next Post

मोठी बातमी! घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Railway-Track

मोठी बातमी! घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.