व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन

रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या राबवलेल्या गणेशमूर्तीदान संकल्पनेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2023
in लोकल, शहर
Ganesh-Idol-Collection

Photo Courtesy : Sandhya Thorat


रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या राबवलेल्या गणेशमूर्तीदान संकल्पनेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक 23 आणि 25 सप्टेंबर रोजी अर्थात गणपती विसर्जनाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी नगरपरिषदेत संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत श्रीगणेश मूर्तींचे संकलन केले गेले.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यात लवकर विघटन होत नाही. तसेच निर्माल्य नदीत सोडल्यास प्रदूषण होते. हे लक्षात घेता रोटरी आणि इनर व्हील क्लब यांनी संयुक्तरित्या हा स्तुत्य उपक्रम राबवला होता. तत्पुर्वी मूर्तीदान करण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. नागरिकांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशमूर्ती दान केल्या. दोन्ही दिवसात मिळून साडेतीनशेहून अधिक मुर्तींचे संकलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

  • नगरपरिषद केंद्रावर एकूण 350 श्रींच्या मूर्तींचे संकलन झाले. लोकांनी बाप्पांना वाजतगाजत आणून, मनोभावे आरती करून जड अंतःकरणाने निरोप दिला. श्रींची मूर्ती दान करणाऱ्या भक्तांना इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात यांच्या हस्ते पर्यावरणाचे रक्षण केल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ही सन्मानचिन्हे श्री प्रसाद आणि कल्याणी मुंगी, श्री उद्धव आणि अर्चना चितळे यांनी उपलब्ध केली होती. दोन्ही दिवसांच्या उपक्रमात चांदनी गांधी, ज्योती जाधव, संगीता शेडे, संगीता जाधव, जयश्री दाभाडे, शलाका वालिया, भावना चव्हाण, कल्पना जाधव, नीता देशपांडे, अर्चना चितळे, कल्याणी मुंगी, तसेच क्लबच्या अध्यक्षा आणि सचिव निशा पवार यांनी हातभार लावला.

ह्या संकलित केलेल्या गणेशमूर्ती पुढील वर्षी नवीन रंगकाम करून उजाळा देण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषद दर वर्षीप्रमाणे निर्माल्यापासून खत निर्मिती करणार आहे. निर्माल्यातील दोरे आणि कापूस पक्ष्यांच्या घरटी बनवण्याच्या कामी येणार आहे. ( Ganesh Idol and Nirmalya Collection through Rotary Club Inner Wheel Club and Municipal Council Of Talegaon Dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर
– ‘पोरी जरा जपून’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar
– मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश


Previous Post

‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके

Next Post

मोठी बातमी! शुक्रवारी शासकीय सुटी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde

मोठी बातमी! शुक्रवारी शासकीय सुटी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
Mla Sunil Shelke On Ncp Merger statement those who do not accept sunetra pawars leadership can take exit route

“अजून वेळ गेलेली नाही.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद, पण..” आमदार सुनील शेळके यांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

March 30, 2026
Vadgaon Nagar Panchayat Distribution of disability fund to disabled beneficiaries by Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

March 30, 2026
Kamshet-Police-Station

कामशेत हादरले… कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime

March 30, 2026
Potoba-Maharaj-Mandir

वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ; तीन दिवसीय यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम

March 30, 2026
Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.