पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील पारिठेवाडी या गावात वसलेली महादेवी देवस्थान हे पुण्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली महादेवी नावाने प्रसिद्ध असलेली पार्वती मातेचे एक स्वरूप आहे. शासकीय नवरात्रौत्सवाला इथे 9 दिवस अहोरात्र देवींची पूजा-अर्चा केली जाते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवस्थान मानले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या पर्वताच्या कुशीमध्ये वसलेले हे मंदिर आहे. मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे हे महादेवी देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील देवीची मूर्तीही तितकीच आकर्षक आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नवरात्रीत या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होते. ( mahadevi temple in parithewadi village of andar maval area which is close to nature )
या देवस्थानाची सर्व व्यवस्था महादेवी मंदिर ट्रस्ट पाहते. माजी सरपंच संदिपशेठ टकले यांनी दुर्लक्षित पर्यटन आणि धार्मिक स्थळाच्या विकासाला चालना मिळाली होती. त्यावेळी मंदिरात आणि मंदिर परिसरात विजेची सेवा, भाविकांसाठी पिण्याचे मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, मेन रस्त्यापासून ते मंदिरापर्यंत पक्का आणि मजबूत डांबरी रस्ता अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मंदिरात पहाटे 5 वाजता नियमित पूजा आणि आरती अभिषेक करण्यात येतो. तसेच पौर्णिमा आणि आमावस्येच्या आदल्या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्नान करून अभिषेक घातला जातो. नवरात्रोत्सवाच्या काळात याठिकाणी मोठा उत्सव आणि जत्रेचे देखील आयोजन करण्यात येते.
भाविकांच्या नवसाला पावणारी महादेवी देवी निसर्गाच्या सानिध्यात असलेले पारिठेवाडी गावचे ग्रामदैवत आहे. तसेच हे मंदिर गावातील पिढीजात मंदिर असून हे एक जागृत मंदिर आहे. हे मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान बनत चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून अस्तित्वात असणाऱ्या या पुरातन महादेवी मातेच्या मंदिराची ख्याती आहे. नवरात्रोत्सव, दसरा, यात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मंदिरात रेलचेल असते.
महादेवी माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराला महाराष्ट्र शासनातर्फे पर्यटन क्षेत्र व तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, आशी मागणी स्थानिक गावकरी व माजी सरपंच संदीपशेठ टकले यांनी केली आहे. तसेच यांच्या पुढाकाराने मंदिराचा कायापालट झाला असून त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
महादेवी मंदिर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाण्याचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योगा साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. पर्यटनासाठी हा एक निसर्गाच्या सानिध्यातील रमणीय परिसर आहे. तसेच संदीप टाकले यांनी असेही सांगितले की, भविष्यामध्ये भारतातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्याचे काम करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ मोठा पुतळाही उभारण्याचं काम ते लवकरात लवकर हाती घेणार आहेत.
अधिक वाचा –
– घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा
– ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…
– अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता