दिवाळी सणानिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासदांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या भागातील सभासद शेतकऱ्यांना दिवाळी भेट म्हणून साखरचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या गटा गटामध्ये जाऊन साखरचे वाटप करण्याचे काम सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी पवनानगर सोमाटणे गटात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वाटप करतांना कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर, ह.भ.प.शंकर महाराज आडकर, मनोहर राजिवडे, करुंज चे सरपंच सदाशिव शेंडगे, पांडुरंग कडू, विजय ठाकर, श्रीधर जाधव, मावळ पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकर, नितीन वाघमारे, संपत ठाकर, अंकुश ठाकर, मोहन घरदाळे, सुनील घरदाळे, सुरेश आडकर, नवनाथ जांभुळकर, लहु कालेकर, जालिंदर जांभुळकर, विठ्ठल दळवी यांच्यासह पवनमावळ परिसरातील शेतकरी साखर घेण्यासाठी मोठ्या उपस्थितीत होते.
“साखर कारखाना दरवर्षी आम्हाला दिवाळीला साखर सवलतीच्या दरात वाटप करत असतो.गेली तीन वर्षांपासून कारखान्याच्या वतीने प्रत्येक गटात साखर वाटप करत असुन यामुळे आम्हाला साखर घेण्यासाठी वाहतुकीचा खर्च होत होता.तो आमचा वाचला आहे.” – विजय पोपट ठाकर, शेतकरी येळसे
“दिवाळीच्या आधी महिनाभर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना गटामध्ये जाऊन सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करत असून यामध्ये शेतकऱ्याचा वाहतुकीसाठी होणारा खर्च कमी होते. प्रत्येक गटामध्ये शेतकऱ्यांना दोन दिवस साखरेचे वाटप केले जात असते.” – नरेंद्र ज्ञानेश्वर ठाकर, माजी संचालक
( sugar distribute at discounted rates to member farmers of Sugar Factory On occasion of Diwali )
अधिक वाचा –
– ‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम
– आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन
– आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!