मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या उपोषणाचा आजचा (दि. 30 ऑक्टो) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याने याप्रकरणी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी मराठा समाजाकडून वाढू लागली आहे. अशात मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे. तसेच उपोषण, मोर्चे, कँडल मार्च अशा विविध मार्गाने आरक्षणाचा लढा तीव्र होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मावळात मराठा आंदोलकांचे सुरु असलेले चक्री उपोषण आज बदलवून आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
संदीप राजाराम तिकोणे – रा. पाटण
भाऊसाहेब विश्वनाथ हुलावळे – रा. कार्ला
कैलास महादु पडवळ – रा. वेहरगाव
प्रकाश चिंतामणी शिंदे – रा. कातवी
ह्यांनी आमरण उपोषण चालू केले आहे.
आरक्षणासाठी चाललेला लढ्याची तीव्रता वाढत असताना सरकारने आता गांभीर्याने विचार करुन लवकर पाऊले उचलावीत. तसेच आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील आपापल्या पक्षांनी लावलेले आपले बँनर, होर्डिंग्ज, पक्षांचे झेंडे संध्याकाळी पर्यंत काढून घ्यावेत आणि वेळेत न काढल्यास उद्या ते सकल मराठा समाजा ह्यांच्या वतीने तोडण्यात अथवा काळे करण्यात येतील, असा इशारा देखील दिला आहे. ( Fast to death by Maratha community protesters in Maval taluk )
अधिक वाचा –
– निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा – 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval
– ‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम
– आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन