व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात चोरी; संतप्त ग्रामस्थांची वडगाव मावळ पोलिसांत तक्रार

मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात असलेल्या पवना धरणाच्या काठच्या प्राचीन शिवमंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 6, 2023
in लोकल, ग्रामीण
Theft-in-Shiva-temple

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात असलेल्या पवना धरणाच्या काठच्या प्राचीन शिवमंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवमंदिरात असलेली प्राचिन 8 किलोची घंटा अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. ग्रामपंचायत शिळींब हद्दीत असलेल्या वाघेश्वर गावात हे प्राचीन शिवमंदिर आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुजारी लक्ष्मण गुरव यांनी सोमवारी (दि. 4 डिसेंबर) सायंकाळी दिवाबत्ती केली. त्यानंतर ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी अर्थात आज, मंगळवार (दि. 5 डिसेंबर) सकाळी ते मंदिरात पुजेसाठी गेले असता, तिथे मंदिरातील घंटा गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब जवळील लोकांना सांगितली. त्यानंतर संतोष कडू, भगवान दरेकर, पोलिस पाटील प्रविण शिंदे आणि आजिवलीचे सरपंच नितीन लायगुडे यांनी ही बाब पोलिसांना कळवून चोरांचा तपास करण्याचे ठरवले आणि वडगाव मावळ पोलिसांत तक्रार दिली.

काही महिन्यांपूर्वी देखील वाघेश्वर येथील या मंदिरातील अतीप्राचिन मुखवटे आणि अन्य वस्तू चोरीस गेल्या होत्या. त्यातील काही मंदिर परिसरात सापडल्या. परंतू आता एवढी मोठी घंटा चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिक संतप्त झालेत. मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. परिसरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. ( Theft in Shiva temple in Wagheshwar village of Pawan Maval area )

अधिक वाचा –
– वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; ‘प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा…’, रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा
– वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव स्टेशन तलावात तरुण बुडाला; आपदा मित्र आणि अग्निशमन दलाकडून तरुणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Next Post

भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-bjp

भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.