व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा; जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या’ : आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी मावळातील विविध विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 12, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Raju Doundkar


भविष्याचा विचार करुन जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना राबविण्यात येत आहेत. ही योजना महत्त्वाची असून यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरणार असुन प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. मावळ तालुक्यात 114 पाणी योजनांची कामे सुरु आहेत. परंतु कालावधी उलटूनही फक्त 27 योजना पूर्ण झाल्या आहेत. अधिकारी व ठेकेदार संगनमत करुन जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत असून पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी मावळातील विविध विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

  • निगडे,कल्हाट,पवळेवाडी येथे मागील काही वर्षांपूर्वी एमआयडीसीचे शिक्के पडले.परंतु अद्यापपर्यंत या भागात उद्योग आले नाहीत.त्यामुळे स्थानिकांनाही काही करता येत नाही. तसेच या भागात इको-सेन्सिटीव्ह झोन देखील आहे.या भागातील हा झोन काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि उद्योग विभाग यांनी पुढाकार घ्यावा.

औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील 882 कामगार मागील 71 दिवसांपासून आपल्या परिवारासह साखळी उपोषण करीत आहेत.तरी या ठिकाणी नव्याने येणाऱ्या ह्युंदाई मोटर्स कंपनीत या कामगारांना रोजगार मिळावा, या प्रश्नावर मार्ग काढून अधिवेशन संपायच्या आधी निर्णय घ्यावा आणि कामगारांना न्याय द्यावा,अशी आग्रही मागणी आमदार सुनिल शेळके यांनी केली.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागासह दुर्गम डोंगराळ भागात विद्युत विभागाच्या मोठ्या प्रमाणात अडचणी उद्भवत आहेत. ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर वारंवार चोरीला जात असून यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नवीन ट्रान्सफॉर्मर मिळण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते.वारंवार ट्रान्सफॉर्मर चोरीला जात असल्याने ही जबाबदारी कोणाची असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला.ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन उपकेंद्र, विद्युत रोहित्र, वीज वाहिन्या सक्षम करण्यासाठी निधीची तरतूद करा,अशा विविध मागण्या त्यांनी मांडल्या. ( Investigate corruption in Jal Jeevan Mission scheme MLA Sunil Shelke demand in winter session )

अधिक वाचा –
– काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या 200 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मावळ भाजपाचे आंदोलन आणि तहसीलदारांना निवेदन
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना मिळणार आकर्षक भेट
– लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन


dainik maval jahirat

Previous Post

तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन

Next Post

‘मावळचा जलनायक’ रिल्सचा प्रथम क्रमांक! आदित्यराजे मराठे ठरला ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय रिल्स स्टार’ । Sunil Shelke Birthday

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sunil-shelke-birthday

'मावळचा जलनायक' रिल्सचा प्रथम क्रमांक! आदित्यराजे मराठे ठरला 'महाराष्ट्राचा लोकप्रिय रिल्स स्टार' । Sunil Shelke Birthday

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.