व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता

मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई गावापर्यंत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 25, 2023
in लोकल, ग्रामीण
kalkarai-village-maval-taluka

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई गावापर्यंत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता होत आहे. रविवारी (दि. 24 डिसेंबर) रोजी कळकराई ते मोग्रज (ता. कर्जत) या जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे दीड कोटी निधीतून मावळ, खेड आणि कर्जत तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या कळकराई या दुर्गम भागातील गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्ता होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

विकासकामांपासुन वंचित असलेल्या या भागात रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम होणार असून सुमारे दीड किलोमीटर पेक्षा अधिकच्या रस्त्याचे काम या निधीतून होणार आहे. कामास तात्काळ सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत. ( bhumipujan of new road from mograj village karjat taluka to kalkarai village maval taluka )

तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी साडेसहा कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात होईल. त्यामुळे या भागाचा विकासाचा अनुशेष भरून निघणार असून पक्क्या रस्त्यांमुळे या भागातील दळणवळणास गती मिळणार आहे.

सदर भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी सावळा ग्रामपंचायतचे सरपंच नागू ढोंगे, सदस्य सचिन तळपे, चंद्रकांत कावळे, सूर्यकांत तळपे, सखाराम कावळे, भरत साबळे, लक्ष्मण कावळे, नारायण मालपोटे, मयूर नाटक, योगेश गायकवाड, सखाराम लाडके, बुधाजी कावळे, अशोक लाडके, पांडुरंग घुटे, लाला लाडके तसेच मोग्रज गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन
– दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत
– नाताळ सण विशेष : सांताक्लॉज नक्की कोण असतो? भगवान येशू ख्रिस्त, ख्रिसमस सण आणि सांताक्लॉजचं नातं काय? नक्की वाचा


dainik maval jahirat

Previous Post

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली आमदार शेळकेंची भेट; आमदारांनी दिला मोलाचा सल्ला!

Next Post

मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Mahavikas-Aghadi

मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.