व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यात निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. Prabha Atre Passed Away

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in महाराष्ट्र, पुणे, शहर
Prabha-Atre

Photo Courtesy : Team Dainik Maval


ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे आज, शनिवारी (दि. 13 जानेवारी) पुण्यात निधन झाले. देशालाही भूषणावह असलेल्या प्रभाताई ह्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. 2022 साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी प्रभाताई अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला. ( Prabha Atre Passed Away ) ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रभाताईंचा जीवनप्रवास –

आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांच्या कन्या असलेल्या प्रभाताईंचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. पं. सुरेशबाबू माने हे त्यांचे पहिले गुरू. पुढे त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून संगीत शिक्षण घेतले. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान व पुणे विद्यापीठातून कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. पाश्चात्य संगीताचा, तसेच कथक नृत्यशैलीचे औपचारिक शिक्षणही त्यांनी घेतले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभाताईंचा लौकिक होता.

पुण्यात ‘गानवर्धन’ व ‘स्वरमयी गुरुकुल’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी संगीतकार्य सुरू ठेवले. आबासाहेब अत्रे प्रशालेच्या माध्यमातून वंचित घटकापर्यंत शिक्षणाची गंगा त्या पोहचवली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप दरवर्षी प्रभाताईंच्या गायनाने होत असे. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ( Kirana Gharana Singer Padma Vibhushan Dr Prabha Atre Passed Away In Pune )

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन.. वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला..पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं.#PrabhaAtre pic.twitter.com/44FTCBDAsB

— Pooja ujagare (@PoojaUjagare) January 13, 2024

सोमवारी होणार अंत्यसंस्कार –

प्रभा अत्रे यांना आज (दि. 13 जानेवारी) पहाटे झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचे निधन झाले होते. प्रभाताईंच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी त्या मुंबईला जाणार होत्या, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

अधिक वाचा –
– मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News
– स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval
– खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away


Previous Post

दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News

Next Post

इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Inner-Wheel-Club-Talegaon-Dabhade

इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.