‘तीन दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मालमत्ता असणारा जेसीबी जळून खाक झाल्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशांचा नाश झालाय. हे बेजबाबदार प्रशासनाचे लक्षण आहे’, असे मत तळेगाव दाभाडे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी व्यक्त केले. तसेच सदर जेसीबी मशीन हे अशोक इंटरप्राईजेस या कचरा कॉन्ट्रॅक्टरला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिले होते, अशी माहिती मिळत असून सदर जेसीबी मशीनची किंमत 25 लाखांच्या घरात आहे. परंतू एवढ्या मोठ्या किमतीचे वाहन मालमत्ता स्वरूपात असताना त्याचे इन्शूरन्स रिन्यू केले नसल्याचे समजत आहे, असेही पारगे यांनी सांगितले.
इन्शूरन्स रिन्यू न करण्याचे परिणाम नगर प्रशासनाला भोगावे लागणार आहे. अशोक इंटरप्राईजेस बरोबर झालेल्या करारात इन्शुरन्स बाबतचा कुठलाही उल्लेख स्पष्टपणे नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सदर मालमत्तेचे नुकसान कोण भरून देणार याबाबत नगर परिषद प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे, असे मत योगेश पारगे यांनी व्यक्त केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एवढ्या मोठा प्रमाणात नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर डंपर ट्रॉली तसेच जेसीबी मशीन असताना यांना पार्किंग करण्यासाठी जागा मिळू नये, ही हास्यास्पद गोष्ट आहे. तसेच एवढ्या मोठ्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटी गार्डची तसेच सीसीटीव्हीची व्यवस्था नाही ही देखील खेदाची बाब आहे, असे पारगे यांनी नमूद केले आहे. इन्शुरन्सद्वारे सदर नुकसान भरून निघाले असते परंतू इन्शुरन्स रिन्यू न केल्यामुळे संपूर्ण 25 लाखांचे नुकसान झालेले आहे, सदर नुकसान कोण भरून देणार याचा खुलासा नगर परिषदेने करावा अशी जाहीर विनंती योगेश पारगे यांनी केलीये. ( Talegaon Dabhade Nagar Parishad JCB was Burnt News Updates )
अधिक वाचा –
– Breaking! किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away
– दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval