व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवभक्तांना सुखद धक्का! तिकोना गडाला मिळाला ‘राजाश्रय’; तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात

वडगाव मावळ येथील गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेने तयार केलेल्या तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
tikona-fort-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) तिकोना गडाच्या ( Tikona Fort ) विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. वडगाव मावळ येथील गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेने हा आराखडा तयार केला होता. राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने आराखडा स्विकारला असून त्याअंतर्गत तिकोना गडावर विविध कामे करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 47 लाख रुपयांची निविदा प्रसारित करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

किल्ले तिकोना हा राज्याच्या असंरक्षित स्मारकामध्ये येत असल्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. परंतू मागील अनेक वर्षांपासून तिकोना किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने ( Gadbhatakanti Fort Conservation Society ) तिकोना गडाचा शास्त्रशुद्ध संवर्धन विकास आराखडा तयार करून घेतला होता.

गडकिल्ले हे शासनाच्या ताब्यात असल्याने त्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करायचे झाल्यास शासकीय बाबी पूर्ण करणे क्रमप्राप्त असते. या बाबींची पूर्तता करण्यासाठी गडाचा कायदेशीर व प्रमाणित विकास आराखडा करण्याबाबत संस्थेला पुरातत्त्व विभागाकडून वारंवार विचारणा होत होती. अखेर गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेने लाखभर रुपये खर्च करून तिकोना गडाचा विकास आराखडा तयार केला होता. ( gad bhatakanti durg sanvardhan sanstha vadgaon maval )

संस्थेच्या या विकास आराखड्याला राज्य पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिली होती. तसेच विकास आराखड्याच्या अंमल बजावणीसाठी आणि किल्ले तिकोनागडावर विविध कामे करण्यासाठी पुरातत्व पुणे विभागाचे उपसंचालक विलास वाहने यांनी 2 कोटी 11 लाख 49 हजार 218 रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गडावर विविध कामे करण्यासाठी 1 कोटी 47 लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. त्याप्रमाणे निविदा प्रसारित झाली आहे. (माहिती साभार/इंटरनेट,फेसबूक)

अधिक वाचा –
– तळेगाव नगरपरिषदेच्या ‘त्या’ जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?
– मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; ‘तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा’ – रविंद्र भेगडे
– इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club


dainik maval jahirat

Previous Post

शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News

Next Post

चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप; उपेक्षित घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आमदार सुनिल शेळकेंकडून विशेष अभियान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke

चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप; उपेक्षित घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आमदार सुनिल शेळकेंकडून विशेष अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.