भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने नुतन कॅलेंडर वर्षा निमित्त निर्मित “श्री दिनदर्शिका 2024” चा प्रकाशन सोहळा श्री तीर्थक्षेत्र देहू येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जन्मठिकाणी “जगद्गुरुकृपांकित भाषाप्रभू ह.भ.प.डॉ. पंकज महाराज गावडे” यांच्या हस्ते संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्री क्षेत्र देहू, शिळा मंदिर तसेच भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे सानिध्य दर्शन घेऊन या पवित्र भूमीत अशा प्रकारे कार्यक्रम करीत असताना समितीच्या भावनांचे महाराजांनी विशेष कौतुक केले. समितीच्या वतीने वेळोवेळी होत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची इत्यंभूत माहिती घेत पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण संघटित होऊन एक वेगळाच आदर्श पुढच्या पिढी समोर ठेवत असल्याचा आनंद व्यक्त करीत पंकज महाराजांनी सदस्यांच्या संकल्पनांचे भरभरून कौतुक केले अन् पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. ( Publication of Calendar of Shri Devdarshan Yatra Samiti By Dr Pankaj Maharaj Gawde At Dehu )
या प्रसंगी श्री क्षेत्र देहू संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, मा.अध्यक्ष नितीन महाराज मोरे, हभप डॉ. विवेकानंद महाराज मोरे, मा. अनिल गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या व्यस्त कार्यपत्रकातून वेळ काढून समितीच्या या समारंभास उपस्थिती दर्शविल्या बद्दल समितीच्या वतीने पंकज महाराज गावडे यांचा विशेष तथा उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सर्वांचे आभार प्रदर्शन करीत असताना येणाऱ्या काळात असेच कार्यरत राहून आपल्या भागवत पंथाच्या पताक्याची शान उंचावण्यास प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन समितीच्या प्रमुख विश्वस्तांनी दिले.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 6 तास महामार्ग राहणार बंद, लगेच वाचा
– इतिहासातील सोनेरी पान : वडगावचा ऐतिहासिक तह : ‘पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला’
– दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin