व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते, विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव केल्यास यश सहज साध्य करता येईल’ – पंतप्रधान

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले, स्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल. यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इर्षा न ठेवता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 1, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
narendra-modi-pariksha-pe-charcha

Photo Courtesy : Internet / Twitter


परीक्षा पे चर्चा या नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता अभ्यासाचा नियमित सराव करुन त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज मिळविता येईल, असे त्यांनी सांगितले. ‘शिक्षणाला सुखद अनुभव बनवून तसेच नैतिक मूल्यांवर लक्ष देऊन विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे,’ असे राज्यपाल रमेश बैस यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. मुंबईत राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रतिभावान मित्र वाढवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला. ( Pariksha Pe Charcha 2024 Prime Minister Narendra Modi )

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले, स्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल. यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इर्षा न ठेवता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, आत्मविश्वास बाळगावा, शिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यांचाही मेळ साधावा. स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीराची आवश्यकता असून त्यासाठी सूर्यप्रकाश, पूर्ण झोप आणि संतुलित आहार या बाबी गरजेच्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाही, तथापि, त्याचा अती वापर टाळून योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लिहिण्याचा सराव कमी होत आहे, याचा दुष्परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नियमित ठेवून ते तपासावे आणि त्यात सुधारणा कराव्यात, यामुळे परीक्षेत येणारा ताण निश्चित कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना ताण येणार नाही यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे सांगून मोदी यांनी त्यांना विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी बंध वाढवावेत. विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना न करता त्यांच्यातील गुणांचे कौतुक करावे, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांची तुकडी बदलते तथापि शिक्षक तेच असतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्यावरील ताण निश्चित कमी होऊ शकेल.

अधिक वाचा –
– डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी असा लौकिक असलेले पंकज देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती! Pankaj Deshmukh
– अखेर पुणे-लोणावळा लोकल दुपारी धावली; मंत्री दानवे, खासदार बारणेंनी दाखवला हिरवा झेंडा । Pune Lonavala Local Train
– ‘नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे’ – रविंद्र भेगडे । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 जागांसाठी 94 उमेदवार इच्छुक, छाननीअंती 90 अर्ज वैध, वाचा सविस्तर

Next Post

महत्वाचे! मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ । Survey Of Maratha Community

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Community-Survey

महत्वाचे! मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ । Survey Of Maratha Community

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.