व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारानंतर आता अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाचे काम होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 27, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Amrit-Bharat-Yojna-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारानंतर आता अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाचे काम होणार आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 26) ऑनलाइन माध्यमातून झाले. तसेच शेलारवाडी, जांभूळ, कामशेत या ठिकाणी बांधलेल्या अंडरपास पुलाचे उद्धाटन आणि पोल क्र. 47 मळवली स्टेशन जवळ अंडरपासच्या कामाचे भूमिपूजनही झाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही ऑनलाइन सहभागी झाले होते. तर खासदार श्रीरंग बारणे हे चिंचवड, देहूरोड रेल्वे स्टेशन येथे उपस्थित होते. देशातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत मावळ मधील रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यासाठी खासदार बारणे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण, सुशोभीकरण व्हावे, प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार बारणे हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांच्या पाठपुराव्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार स्टेशनचा योजनेत समावेश झाला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

आता अमृत भारत योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशन नूतनीकरण व सुधारचे काम हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन कामाचे भूमीपूजन झाले. तसेच शेलारवाडी, जांभूळ व कामशेत या ठिकाणी बांधलेल्या अंडरपास पुलाचे उद्धाटन व पोल क्र. 47 मळवली स्टेशन जवळ अंडरपास या कामाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ( Expansion of Chinchwad Dehu Road Lonavla Railway Stations Under Amrit Bharat Railway Station Yojana )

विस्तारीकरणात काय होणार –
रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिले जाणार असून रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे.

अधिक वाचा –
– कशाळ येथील साकव पुलाचे ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन; 42 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळकेंचे मानले आभार
– मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप
– मावळ खरेदी-विक्री संघावर महायुतीची एकहाती सत्ता! ‘या’ 3 उमेदवारांचा धक्कादायक पराभव, एका क्लिकवर वाचा संपूर्ण निकाल


dainik maval jahirat

Previous Post

मोठी कारवाई! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

माळवाडी गावच्या उपसरपंचपदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
malwadi-maval

माळवाडी गावच्या उपसरपंचपदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.