व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज (दि. 4) मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2024
in मावळकट्टा, महाराष्ट्र
Eknath-Shinde-Uddhav-Thackeray

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज (दि. 4) मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंवाद दौरा आहे. ते मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. मात्र मावळ दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मावळ लोकसभेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभेत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. ठाकरे गटाचे नवघरचे पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे नेते क्षितीज शिंगरे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ( Maval Lok Sabha Constituency Uddhav Thackeray Party Leaders Join Eknath Shinde Shiv Sena )

उद्धव ठाकरे यांचा आज मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ते पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. दुपारी तीन वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते दुपारी चार वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत, त्यानंतर साडेपाच वाजता खोपोलीमध्ये सभा होणार आहे, आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता उरणच्या नवीन सेवा मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता ते तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणूकीसाठी तयारी करत आहेत. तर दुसरीकडे नुकतेच राष्ट्रवादीमधून ठाकरे गटात आलेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरे मावळ लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा –
– दैनिक मावळ संवाद : पत्नीसोबत मोमोज खात असताना आयडीया सुचली आणि तिथूनच सुरु झाला नवा प्रवास… । Content Creator & Blogger Manoj Shinguste
– ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ
– अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहरात आमदार सुनिल शेळकेंचा झंझावात! एका दिवसात 17 ठिकाणी भूमिपूजन आणि नागरिकांशी संवाद

Next Post

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mazi-Shala-Sundar-Shala

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.