मावळचे ( Maval Taluka ) माजी भाजपा आमदार बाळा भेगडे ( BJP Bala Bhegade ) यांनी क्रशर व्यावसायिकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड पोलीस ( Pimpri Chinchwad Police ) आयुक्तांकडे केली होती. त्यावर क्रशर व्यावसायिक हे माफिया नसल्याने बाळा भेगडेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी हमी मावळचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी दिली होती. त्यावर सुनिल शेळकेंना स्थानिक भूमीपुत्रांविषयी अचानक तळमळ का? असा सवाल बाळा भेगडे यांनी विचारला आहे. ( Former State Minister BJP Bala Bhegde Criticizes Maval MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नेमकं काय म्हणाले बाळा भेगडे?
“मावळ तालुक्याचे विद्यमान आणि उच्चशिक्षित आमदार सुनीलजी शेळके यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे.परंतु दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रसिध्दीस दिलेले पत्रक व प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान हे त्यांच्या राजकीय, शैक्षणिक व कायदेशीर अज्ञानातुन केलेले असल्याने, अशा बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा मी निषेध करतो व त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याला मी काहीएक महत्त्व देत नाही.”
“मावळ तालुक्यातील बेकायदेशिर उत्खननाबाबत मी मा.हरित लवाद यांचेकडे याचिका दाखल केलेली आहे, सदरची याचिका न्यायाधिन असल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारचे विधान मी करणार नाही. त्याबाबत योग्य त्या चौकशी व निकालाअंती सर्व सत्यता समोर येईल, परंतु आमदारांनी उपस्थित केलेल्या भुमिपुत्रांबाबतच्या आस्थेबद्दल मला खुप आश्चर्य वाटत आहे, कारण मावळ तालुक्यातील भुमिपुत्रांना ज्ञानदान करणाऱ्या व ज्ञानाची पंढरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेच्या नियोजित विद्यालयाच्या बांधकामास स्थगिती देण्याकरीता राजकीय दबाब निर्माण करून सदरच्या बांधकामाची चौकशी करण्याकरीता मा. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पत्रव्यवहार करून सदरचे बांधकामास स्थगिती देण्यात आलेली आहे.”
हेही वाचा – मावळचं राजकारण I मामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, भाच्याने ठणकावून सांगितले
“सुमारे 5000 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या,मावळभुषण मा. कृष्णराव भेगडे साहेब व कै. केशवराव वाडेकर साहेब व अनेक जेष्ठ संचालकांनी जतन केलेली व उद्योजक मा.रामदासआप्पा काकडे यांचे नेतृत्वात संस्था विकसित होत असताना, आमदारांच्या कर्तुत्वांमुळे संस्थेच्या विकासाला खिळ बसली व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच गेले अडीच वर्षामध्ये स्थानिक भुमिपुत्र कर्ज घेऊन व्यवसायांमध्ये स्थिरस्थावर होत असताना, राजकीय आकसापोटी शासकीय यंत्रणेस वेठीस धरून,भुमिपुत्रांच्या व्यवसायावर व घरादारांवर नांगर फिरवण्याचे आदेश देताना, स्थानिक भुमिपुत्रांविषयीची तळमळ कुठे धूळ खायला गेली होती आमदार साहेब हे तुमच वागण बर नव्हं…!”
अधिक वाचा –
– सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून 45 विद्यार्थ्यांना किल्ले लोहगड दुर्गदर्शन
– डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल; वडगाव भाजपाचे निवेदन