व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन उपविभागासह दोन शाखा कार्यालयांची निर्मिती । Pune News

महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन करण्यात आले आहे. चाकण उपविभागाच्या विभाजनातून चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 10, 2024
in पुणे, ग्रामीण
mahavitaran

file image


महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन करण्यात आले आहे. चाकण उपविभागाच्या विभाजनातून चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातही नव्याने स्थापित चाकण एमआयडीसी उपविभागांतर्गत वासुली आणि निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली गेली आहे. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण 36 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली असून मार्च महिन्यात ही कार्यालये सुरू होतील. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महावितरणच्या राजगुरुनगर विभागामध्ये सध्या चाकण, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि राजगुरुनगर असे पाच उपविभाग आहेत. यात चाकण उपविभागांतर्गत एकूण पाच शाखा कार्यालये आहेत. चाकण उपविभागातील 1 लाख 13 हजार ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे 7 हजार 800 उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत. (Division of Chakan Subdivision from Mahavitaran)

चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील प्रामुख्याने किंग्फा व युंदाई 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन गेल्या डिसेंबरमध्ये एकाचवेळी कार्यान्वित करण्यात आले आहे.

आता चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग तयार करण्यात आला आहे. नव्या रचनेत पूर्वीच्या चाकण उपविभागात (कंसात ग्राहकसंख्या) चाकण शहर (27,654), भोसे (10,746), आळंदी शहर (23,759) आणि आळंदी ग्रामीण (8315) ही चार शाखा कार्यालये व एकूण 70 हजार 574 ग्राहकसंख्या असेल. तर नव्या चाकण एमआयडीसी उपविभागात चाकण ग्रामीण (19,163), वासुली (8206), निघोजे (14,934) हे तीन शाखा कार्यालय व एकूण 42 हजार 303 ग्राहक असतील.

चाकण एमआयडीसी उपविभाग कार्यालयासाठी उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे 6 पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद अशी 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या वासूली व निघोजे शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ असे प्रत्येकी 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत.

अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News
– विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान । Pimpri Chinchwad
– महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज आणि जाखमाता देवी या भाऊ-बहिणीची भेट; ग्रामस्थांनी जपली 100 वर्षांपासूनची परंपरा । Vadgaon Maval 


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away

Next Post

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील 13 पोलिस निरिक्षकांची नेमणूक, तळेगाव दाभाडे येथे ‘या’ दमदार अधिकाऱ्याची नेमणूक । Pimpri Chinchwad Police

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maharashtra-police

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील 13 पोलिस निरिक्षकांची नेमणूक, तळेगाव दाभाडे येथे 'या' दमदार अधिकाऱ्याची नेमणूक । Pimpri Chinchwad Police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.