व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी नाहीतर…’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी अशी मागणी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
vijay-shivtare-ajit-pawar-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली आहे. वडगाव मावळ येथे आज (दि. 20) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केलीये. विजय शिवतारे यांना बारामतीत उमेदवारी दिल्यास राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात काम करू असा थेट इशारा राष्ट्रवादीने शिंदे गटाला दिला आहे. मावळ तालुक्यात आधीच शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झालीये, त्यामुळे शिवतारेंच्या भूमिकेचा मावळमध्ये फटका बसू शकतो. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

बारामती लोकसभा मतदारसंघात बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या विजय शिवतारे यांना शांत करा. अन्यथा आम्ही मावळ लोकसभेत शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भुमिका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी घेतलीये. त्यामुळे विजय शिवतारे यांनी बारामतीमधून उमेदवारी मागे न घेतल्यास लोकसभा निवडणुकीत मावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजोग वाघेरे यांचा प्रचार करणार का, हेही पाहावे लागेल. एकूण या प्रकरणामुळे श्रीरंग बारणे यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. ( vijay shivtare should apologize to ajit pawar otherwise ncp will stop campaigning for shrirang barne )

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात मावळ तालुका अजित पवार गट आक्रमक झाला आहे. विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागावी, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. शिवतारे यांचा मुंबईला जाणारा रस्ता हा मावळमधून जातो. वरिष्ठ पातळीवर जर शिवतारे यांना समज दिली गेली नाही, तर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मावळ लोकसभेच्या उमेदवाराचे काम केले जाणार नाही. तर बारामती लोकसभेमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांचे काम केले जाईल, असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरुद्ध शड्डू ठोकणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजय शिवतारे यांच्या कडव्या विरोधाचा सामना करावा लागणार, हे जवळपास निश्चित आहे.

अधिक वाचा –
– ‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा
– वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime
– मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.