व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे 150 पक्षीप्रेमींना चिमण्यांच्या कृत्रिम घरट्यांचे वाटप । Vadgaon Maval

चिमण्यांची संख्या वाढावी, त्यांना हक्काचे घरटे मिळावे यासाठी मोरया प्रतिष्ठान वडगाव आणि आविज् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी संवर्धन प्रकल्प राबवला जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 21, 2024
in शहर, लोकल
world-sparrow-day

Photo Courtesy : Team Dainik Maval


चिमण्यांची संख्या वाढावी, त्यांना हक्काचे घरटे मिळावे यासाठी मोरया प्रतिष्ठान वडगाव आणि आविज् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी संवर्धन प्रकल्प राबवला जात आहे. याअंतर्गत मोरया प्रतिष्ठानच्या कार्यालयात कृत्रिम घरटी बनविण्याचे काम हाती घेऊन सुमारे 250 चिमण्यांची घरटी बनविण्यात आली होती. जागितक चिमणी दिवसाचे औचित्य साधून पक्षी संवर्धनासाठी गेल्या आठवड्याभरात नावनोंदणी केलेल्या सुमारे 150 नागरिकांना ही चिमण्यांची घरटी विनामूल्य भेट देण्यात आली. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, आविज् फाऊंडेशनचे संस्थापक अविनाश नागरे, माजी नगरसेविका पूनम जाधव आणि वडगाव शहरातील पक्षीप्रेमी नागरिक उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटची जंगले, शेतीवरील औषध फवारणी, पाण्याचे प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा सर्व पर्यावरण हानी करणाऱ्या गोष्टींमुळे निसर्गातील पशू पक्ष्यांचे जीवन संकटात आले आहे. त्यात जागतिक तापमानवाढ अर्थात वाढत्या उष्म्यामुळे चिमणी सारख्या नाजूक पक्षाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. म्हणूनच चिमणी संवधर्नासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. ( distribution of artificial nests to bird lovers on occasion of world sparrow day at vadgaon maval )

सर्वांना लहानपणी जेवू घालताना आई-वडील ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ करून जेवू घालतात. परंतू सध्या हे घास भरवणं जरी होत असलं तरीही चिऊ आणि काऊ मात्र आपल्या सभोवताली सहजरित्या दिसत नाही. त्यातही पूर्वी सहज दिसून येणारी चिऊताई आता अगदी दिसेनाशी झालीये. आपल्या जैवसाखळीतून चिमणी अगदी नामशेष होईल की काय, अशी भिती निर्माण झालीये. याच चिमणी साठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade
– ‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी नाहीतर…’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका
– लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct


dainik maval jahirat

Previous Post

मावळ राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण । Talegaon Dabhade

Next Post

दैनिक मावळ ‘संवाद’ : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक ‘हृदयमानव’ याच्यासोबत खास बातचीत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ashok-thokal-aka-hridaymanav

दैनिक मावळ 'संवाद' : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक 'हृदयमानव' याच्यासोबत खास बातचीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.