व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट । LPG Gas Cylinder Price

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 1, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
LPG-Gas

Photo Courtesy : File Photo - LPG Gas


नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज पासून (दि. 1 एप्रिल) कपात करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिकची कपात करण्यात आलीये. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झालाय. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मागील तीन महिन्यापासून एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा भडका उडाला होता. मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याशिवाय जानेवारी महिन्यातही एलपीजी सिलेंडर 1.50 रुपयांनी महागला होता. आता तीन महिन्यानंतर एलपीजी स्वस्त झाला आहे. ( LPG PRICE CUT COMMERCIAL CYLINDER GETS CHEAPER BY RS 30.50 )

गॅस सिलेंडर कुठे, किती रुपयांनी स्वस्त?
दिल्ली – एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झालेत.
कोलकाता – एलपीजी सिलेंडरचे दर 32 रुपयांनी कमी झालेत.
मुंबई – एलपीजी सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी कमी झालेत.
चेन्नई – एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झालेत.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर स्थिर –
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडर म्हणजे 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.

अधिक वाचा –
– उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट
– मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार मोहिमेसाठी काँग्रेसकडून मावळ विधानसभेत समन्वय समिती स्थापन, पाहा संपूर्ण यादी
– शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024

Next Post

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.