भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे आज (दि. 1) मावळ भाजपाची मासिक बैठक पार पडली. यावेळी कु. प्रतिक घोडेकर यांची टाकवे शहर भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी, तर कु. रोशन शिंदे यांची कामशेत शहर भाजपा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ विधानसभा प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे हे यावेळी उपस्थित होते. तसेच बैठकीला तालुक्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( monthly meeting of Maval BJP was concluded at party office in Vadgaon )
अधिक वाचा –
– ‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024
– ‘थकीत कर भरा… नाहीतर चौकाचौकात फलकांवर नावे लावू’, थकीत कर वसूलीसाठी तळेगाव नगरपरिषद प्रशासन आक्रमक । Talegaon Dabhade
– उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट