व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘उड्डाणपूल हवा पण…’ वडगावमधील केशवनगर रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2024
in लोकल, शहर
vadgaon-maval-railway-bridge

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, या कामामध्ये कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र जाईल? हे निश्चित करण्यासाठी आवश्यक क्षेत्राची प्रथम मोजणी करुन द्यावी, असा प्रस्ताव ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्याला संबंधित शेतकऱ्यांनी संमती दिल्याने लवकरच या क्षेत्राची मोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नियोजित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा महामंडळाच्या (महारेल) अधिकाऱ्यांनी नुकतीच बाधित शेतकऱ्यांची पंचमुखी मारुती मंदिराच्या प्रांगणात बैठक घेतली. उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र विरोध दर्शविला. तसेच पुलाची जागा बदलण्याची मागणी केली. ( Farmers opposition to planned flyover on site of Keshavnagar railway gate at Vadgaon Maval )

या बैठकीला ‘महारेल’च्या पुणे कार्यालयातील अधिकारी महेश ढेमरे, ज्ञानेश्वर साळुंखे, अनिकेत पाटील, रूप सिंग, हमीद शेख, भूषण बिडवे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, माजी नगरसेवक दिनेश ढोरे, मारुती चव्हाण, नितीन चव्हाण, बाळासाहेब तुमकर, ज्ञानेश्वर ढोरे, विराज हिंगे, संजय दंडेल, अर्जुन ढोरे, गणेश ढोरे, श्रीनिवास गोरे आदी उपस्थित होते.

यापूर्वी वडगावच्या रेल्वे फाटकाच्या जागेवर भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू होते. परंतु, त्याला विरोध झाल्याने नंतर तो रद्द करण्यात आला. या भागाची भविष्याची गरज लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या प्रकल्पात जमिनी गेल्यास भूमिहीन होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर, उड्डाण पुलाच्या कामासाठी जेवढे आवश्यक तेवढेच व कमीत कमी क्षेत्र संपादित केले जाईल. तसेच बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला दिला जाईल, असे आश्वासन ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी दिले.

अधिक वाचा –
– पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे
– महत्वाची बातमी! निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध । Lok Sabha 2024
– जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

Next Post

सोसायटी मेंटेनन्स न भरल्यास जप्ती कायदेशीरच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Court

सोसायटी मेंटेनन्स न भरल्यास जप्ती कायदेशीरच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.