व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जय शिवराय..! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार

मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड आणि किल्ले विसापूर या दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 6, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
shivaji-maharaj-statue-bhaje-village

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड आणि किल्ले विसापूर या दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून भाजे ग्रामस्थ आणि मावळ परीसरातील शिवभक्तांच्या वतीने लोहगड विसापूर किल्ल्यांच्या पायथ्याशी वसलेल्या भाजे गावात स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

भाजे गावातील तरुणांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला. एक मुखाने त्याला मान्यता मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये पुतळा उभारण्याकरिता लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात करण्यात आली. लोक सहभागातून हे काम करण्यात आले असून भाजे गावातील प्रत्येकाचा त्यामध्ये हातभार लागला आहे. सोबतच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्‍तीने देखील या कामी मदतीचा हात दिला आहे. सर्वांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने भाजे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. ( statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be unveiled in Bhaje village on Gudhi Padwa )

पुतळ्याला चारही दिशेने राजमुद्रा बसवण्यात आली आहे. पुतळ्याच्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये याच ठिकाणी शंभर फूट उंचीचा भगवा ध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजता पारंपारिक वेशभूषेमध्ये व पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये भाजे गावांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मावळ परिसरामधील तमाम नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होत या ऐतिहासिक सणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भाजे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसात वाजता या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम व महाराजांचे पोवाडे या ठिकाणी सादर केले जाणार असून तदनंतर महा भंडारा आयोजित करण्यात आला आहे.

अधिक वाचा –
– ‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha
– राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन
– सोसायटी मेंटेनन्स न भरल्यास जप्ती कायदेशीरच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा


dainik maval jahirat

Previous Post

शरीराला थंडावा मिळावा म्हणून विहिरीत उडी घेतली पण आत्माच थंड झाला; टाकवे येथील दुर्दैवी घटना । Maval Accident News

Next Post

मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voter-awareness-program

मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.