मावळ तालुक्यातील बेबडओहळ गावात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आपण आपल्या विवेकशील बुद्धीचा वापर करून आपला हक्क बजवावा व लोकशाहीचा आदर करावा,’ असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी यावेळी केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी शालिनी कडू, पंचायत समिती विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, ग्रामविकास अधिकारी पवार, तालुका अभियान व्यवस्थापक सुभाष गायकवाड, प्रभाग समन्वयक लक्ष्मण मुदगून, प्राजक्ता घारे आदी मान्यवरांसह गावातील हिरकणी महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी सर्वांनी लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली. ( voter awareness program was organized at Bebadohal in maval taluka )
‘आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आपण आपल्या विवेकशील बुद्धीचा वापर करून तो हक्क बजावला पाहिजे व लोकशाहीचा आदर केला पाहिजे. उमेद अभियानांतर्गत निधीतून उपजीविका बळकट करण्यासाठी गावातील सर्व गरजू व गरीब महिलांनी एकत्र येऊन किमान एक तरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे,’ असे शालिनी कडू यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
– ‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha
– राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन