व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देशभरातील पालकांसाठी महत्वाची बातमी! जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, बाळाच्या जन्म दाखल्यावेळी ‘ही’ माहिती द्यावी लागणार

देशभरातील पालकांसाठी एक महत्वाची माहिती आहे. केंद्र सरकारने बाळाच्या जन्म दाखल्यात महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Verification-of-Birth-Records

Photo Courtesy : Team Dainik Maval


Birth Registration New Rules : देशभरातील पालकांसाठी एक महत्वाची माहिती आहे. केंद्र सरकारने बाळाच्या जन्म दाखल्यात महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जन्म दाखल्यात बाळाच्या आई-वडिलांबाबतची एक माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकंदरीत जन्म दाखल्याच्या फॉरमॅटमध्ये काय बदल करण्यात आलाय आणि त्याचा वापर कशासाठी होईल, हे आपण या लेखात सविस्तर पाहूयात… ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

केंद्रीय गृहमंत्रालयाने जन्म दाखल्याच्या नियमांबाबत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता कुटुंबातील नव्या सदस्याच्या अर्थात बाळाच्या आई-वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवजात बालकाच्या आई आणि वडिलांचा धर्म आणि इतर माहिती स्वतंत्रपणे नोंदविण्यात येणार आहे. ( Birth Registration New Rules Parents Need To Record Religion Separately For Child Birth Certificate )

याअगोदर देखील बालकाच्या जन्म नोंदणीवेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती. परंतू आता कुटुंबात नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात प्रारुप नियमावली तयार केली आहे. गृह मंत्रालयाकडून बदलांचा हा प्रस्ताव सर्व राज्यांना पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नव्या पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे.

यापूर्वीच्या लहान मुलाच्या जन्मासंबंधी नोंदणी अर्ज क्रमांक-1 मध्ये कुटुंबाच्या धर्माचा रकाना होता. आता नवीन नियमानुसार त्यासोबत अजून एक कॉलम जोडण्यात आला आहे. या कॉलममध्ये लहान मुलाचे आई वडिलांशी संबंधित माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दत्तक घेण्याची प्रक्रियेसाठी फॉर्म क्रमांक-1 जरुरी आहे. गेल्या वर्षी जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा पारित करण्यात आला होता. यामध्ये विशेष बदल पाहायला मिळाले. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावरही जन्म-मृत्यूची नोंदणी आवश्यक असेल. दैनिक भास्करमध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसारित झाले आहे.

सरकारचे दुरगामी धोरण –
सरकार येत्या काळात या माहितीचा विविध सरकारी योजना, विविध ओळखपत्रासाठी वापर करण्याची योजना आखत आहे. तुम्ही नोंदवलेल्या माहिती आधारे जन्मदाखल्याच्या फॉर्म क्रमांक – 1 मधून मिळणाऱ्या डेटाबेस आधारे या सेवांसाठी त्याचा वापर होईल. अनेक कागदपत्रांच्या अपडेटसाठी ही माहिती उपयोगी पडले. त्यासाठी तुम्हाला दहा वेळा दस्तावेजाची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. लहान मुलाच्या जन्माची ही माहिती डिजिटल सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट म्हणून जतन होईल.

इथे होईल उपयोग –
नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR), आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, शाळेत प्रवेशासाठी, महाविद्यालय, विद्यापीठातील अभ्यासक्रमास प्रवेश घेताना, शिष्यवृत्तीसाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी, इतर सरकारी योजना, सरकारी गुंतवणूक योजनांसाठी डेटाबेस महत्वाचा, मृत्यूवेळी पडेल उपयोगी

मृत्यू प्रमाणपत्रावेळची फरफट थांबेल –
मृत्यू प्रमाणपत्रासाठी तुमची जन्माची डिजिटल माहिती आपोआप समोर येईल. मृत्य प्रमाणपत्रासोबतच त्याचा बँक तपशील, पीएफ, विमा आणि इतर माहिती समोर येईल. संबंधित विभागाला मृत्यूची माहिती कळविण्यात येईल. त्यामुळे नातेवाईकांना नाहक कागदपत्रांची जंत्री घेऊन संबंधित दावा करण्याची गरज उरणार नाही. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येते. मृत्यूचे कारण आणि काही जुना आजार असेल तर त्याची माहिती देणे पण आवश्यक आहे. देशभरात आरजीआय जन्म आणि मृत्यूची माहिती जतन करणारी संस्था आहे.

अधिक वाचा –
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक
– वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval
– मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ


dainik maval jahirat

Previous Post

रविवारची सकाळ भीषण अपघाताने! द्रुतगती मार्गावर नवीन बोगद्याजवळ अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway

Next Post

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-BJP

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.