व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी ‘माधवी जोशी’ यांना उमेदवारी जाहीर । Maval Lok Sabha

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी नरेश जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 20, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Madhavi Joshi in Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी नरेश जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांच्या मतदारांमध्ये हमखास विभागणी होणार, असा जाणकारांचा अंदाज आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे पत्रक त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवार दिला जाणार, अशी बातमी दैनिक मावळने यापूर्वीच प्रसिद्ध केली होती. दैनिक मावळच्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ( Vanchit Bahujan Aghadi Party Announced candidature of Madhavi Joshi in Maval Lok Sabha Constituency )

माधवी जोशी यांनी मागील वर्षीपासूनच लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसली होती. परंतू दरम्यानच्या काळात त्यांच्या कडून फारशी हालचाल दिसून आली नाही. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्थात शरद पवार गटात प्रवेश केल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून मावळ लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली, आणि येथे संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी मिळाली.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली.#VBAForIndia pic.twitter.com/NRofr4vlbl

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024

दुसरीकडे महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. अशात माधवी जोशी यांच्यासाठी उमेदवारीचा पर्याय उरला नव्हता. परंतू आता त्यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने मावळच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. माधवी जोशी मावळ लोकसभेत एका प्रस्तापित पक्षाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत, ज्या घाटाखालील भागातून येतात. त्यामुळे अर्थात आता मावळ लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होणार, यात शंका नाही.

माधवी जोशी यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘वंचित’मध्ये प्रवेश केला होता. दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नव्हती. डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता. परंतू आता ऐनवेळी माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मावळमध्ये वंचितने आता मतदारांना तिसरा पर्याय दिलाय. यापूर्वी राजाराम पाटील यांनी वंचितकडून मावळ लोकसभा लढवली होती.

अधिक वाचा –
– वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval
– शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप
– मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर.#VBAForIndia pic.twitter.com/cTVbUu1Htp

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024


dainik maval jahirat

Previous Post

एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या

Next Post

धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.