व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवारांच्या पराभवाचा वचपा काढणार, असा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 23, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
mla rohit pawar on parth pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवारांच्या पराभवाचा वचपा काढणार, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मंगळवारी (दि. 23 एप्रिल) महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी मविआकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार भाषण केले. ( mla rohit pawar on parth pawar will defeat shrirang barane in maval lok sabha election )

महायुतीचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 साली देखील शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा लढलेल्या बारणेंनी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव केला होता. हा पराभव पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. परंतू गेल्या निवडणुकीत ज्या बारणेंना विरोध केला आणि ज्यांनी आपल्या मुलाला पाडले, त्यांच्याच प्रचारात आता अजित पवार दिसू लागले आहेत. त्यावरुन आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे.

‘आम्ही विचार सोडलेले नाहीत. त्यामुळे आम्ही कालही बारणेंविरोधात लढलो आणि आजही लढतोय. मागील निवडणुकीत मावळमध्ये मी पार्थसाठी प्रचार केला. पण दुर्दैवाने त्यांचा मोठा पराभव झाला. लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंसाठी आता अजित पवार प्रचार करत आहेत. पण मी भावाच्या पराभवाचा बदला घेईन,’ असा निर्धार बोलून दाखवत रोहित पवारांनी अजितदादांना टोला लगावला.

अधिक वाचा –
– धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News
– आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News
– मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, मविआचे ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश । Padma Awards 2024

Next Post

संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Sanjog Waghere property

संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे - पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.